ऐश्वर्यम कम्फर्ट सोसायटी आकुर्डी मध्ये ७५वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक मा. श्री. देवाराम वारे व श्री रामकृष्ण डे उपस्थित होते.उपस्थित मान्यवारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आजच्या दिनाचे औचित्य साधून सोसायटी मधील बालचमुनी विविध गुणदर्शन सादर केले जसे की भारताचे संविधान वाचन, गीते तसेच नुत्य सादर केले. सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री अमोल गणपत गोरखे यांनी उपस्थित बालचमुचे कौतुक करून उपस्थित सोसायटी सभासदांचे सेक्रेटरी निलेश जाधव यांनी आभार मानले .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित बाबर, पंकज टाले, मिलींद पांडे निलेश डोईजोडे कल्याण कळपे, सेबी पॉल अमन शेख संजय शिळसाळकर निलेश पटेल निरंजन पटेल सागर आंबेकर यांच्या सहभागातून कार्यक्रम संपन्न झाला ऐश्वर्यम कम्फर्ट सोसायटी या खंडोबा मंदिर जवळ आकुर्डी येथील सोसायटीमध्ये दि. २६ जानेवारी२०२४ वार : शुक्रवार रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.