शांताबाई गणपत हुलावळे यांचे वृद्धापकाळाने निधन…


पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
हिंजवडी येथील शांताबाई गणपत हुलावळे (वय 109) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
आपली इच्छाशक्ती व प्रतिकार शक्तीच्या जोरावर शांताबाई हुलावळे यांनी कोरोनावरही मात केली होती. 109 व्या वर्षीही त्यांचे खणखणीत बोलणे होते. हिंजवडी येथील सर्वात वयोवृद्ध म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. कै.ह.भ.प. किसन महाराज हुलावळे, सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत हुलावळे व ज्ञानेश्वर हुलावळे यांच्या त्या मातोश्री होत.