पिडीत मुलीचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारीत करणाऱ्या आरोपीस गोवा राज्यातुन जेरबंद, सहकारनगर पोलीस स्टेशन ची कारवाई

IMG-20240130-WA0422

गोवा परराज्यात सहकारनगर पोलीस स्टेशनची मोठी कामगीरी पिडीत मुलीचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारीत करणाऱ्या आरोपीस गोवा राज्यात शोध घेवुन सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे यांनी केले जेरबंद

पुणे (ऑनलाईन न्युज परिवर्तनाच सामना )

तक्रारदार पिडीत मुलगी हिला अश्लील व्हिडीओ कॉल करणेस भाग पाडुन तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला होता. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याने राग मनात धरुन सदरचा व्हिडीओ फेक इन्स्टाग्राम आयडी बनवुन तसेच युट्युब वर लिंक बनवुन अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारीत केल्याबद्दल एका आरोपीस सहकारनगर पोलिसांनी गोवा राज्यात जाऊन जे्रबंद केले आहें

पिडीत मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता भादवि कलम ३५४ (क) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००५ कलम ६७ (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पिडीत महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे सदर व्हिडीओ कोणी प्रसारीत केला त्याबाबत काही माहिती नसताना तसेच आरोपीचा कोणताही ठाव ठिकाणा नसताना सदर बाबत तांत्रीक विश्लेषन करुन तसेच माहिती मिळवुन संशयीत आरोपी हा गोवा राज्यात पणजी येथे कोणत्यातरी पंचतारांकित हॉटेल मध्ये नोकरीस असले बाबत माहिती काढुंन अटक करण्यात आली आहें

पंरतु कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे त्याची माहिती मिळाली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र माळाळे, यांचे मार्गदर्शनाखाली व सुचने प्रमाणे आरोपीचा शोध घेणेकामी सहकारनगर पोलीस स्टेशन कडील सहा. पोलीस फौजदार सोपान नावडकर, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, सागर सुतकर, निखील राजीवडे यांनी गोवा राज्यामधील पणजी येथे जावुन आरोपीचा वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेल मध्ये ४ दिवसांपासुन शोध घेत होते

.सदर आरोपी हा ज्या पंचतारांकित हॉटेल मध्ये कामास आहे त्याबाबत माहिती मिळवुन सदर हॉटेलचे बाहेर सापळा रचुन दिनांक २९/०१/२०२४ रोजी संशयीत आरोपी नामे विनय शेकापुरे हा हॉटेलमधील काम संपवुन घरी जात असताना हॉटेलचे बाहेर आला असता त्यास ताब्यात घेवुन सदर इसमाचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव विनय मारुती शेकापुरे वय २३ वर्ष धंदा नोकरी राह. सध्य गणेश कृपा, नालंदा कॉलनी, मिरमार पणजी गोवा मुळ राह. मुपो. मुखेड ता. मुखेड, जि. नांदेड असे सांगितले

दाखल गुन्हयाबाबत विचारणा केली असता त्याने पिडीत मुलीचा रागाचे भरता इन्स्टाग्राम व युट्युब वर अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केले बाबत कबुली दिल्याने सदर आरोपीस गोवा राज्यातुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली

. न्यायालयाने त्याची तपासकामी पोलीस कस्टडी दिली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र माळाळे हे करीत आहेत.सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त सोो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील सोा, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सोा, सहा. पोलीस आयुक्त, नंदिणी वग्यांनी स्वारगेट विभाग सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, स.पो. फौ. सोपान नावडकर, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतारे, सागर सुतकर, निखील राजीवडे यांनी केली आहे.

Latest News