कोविड काळापासून पिंपरी महापालिकेच्या कामाची चौकशी करावी.. तुषार कामठे

tushar kamthe

कोविड काळापासून महापालिकेच्या कामाची चौकशी करावी.. तुषार कामठे

भाजपा सरकारने कितीही चौकशी केल्या तरी अजित पवार  हे खरेच महाराष्ट्र च्या विकासासाठी अजित पवार भाजपा बरोबर गेले असतील तर त्यांनी पिंपरी महापालिकेच्या कोविड काळापासून महापालिकेच्या कामाची चौकशी करावी  अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष  तुषार कामठे यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत केली आहेंशहरातील स्मार्ट सिटी कामाची चौकशी करा , सगळ्या टेंडर मध्ये सत्ताधारी भाजपा आमदार आणि नगरसेवकाचे नातेवाईकांना ठेके दिल्यामुळे महापालिका आर्थिक अडचणीत आली आहें,त्यामुळे शहरात करोडो रुपयाची घोटाळा सत्ताधारी भाजपा सरकारने केले आहें,जॅकवेल. मध्ये 30 कोटी चा घोटाळा झाला होता त्याच आज काय झालं अजित पवार यांनी जाहीर करावेया देशात केंद्रात, राज्यातील  सरकार आम्ही घालवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा तुषार कामठे यांनी दिला आहें

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार हे आहे. ते आपले आजोबा शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत.

शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीर गटाविरोधात राज्यभरात रान पेटवले आहे आणि राज्यातील सामान्य नागरीक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्द्यांवरही ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. केवळ आपल्या मतदारसंघापुरतेच मुद्दे ते मांडत नाहीत तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहेत

Latest News