उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा पोलीस स्टेशन मध्ये गोळबार,मुख्यमंत्री शिदे यांच्यावर गंभीर आरोप


भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा पोलीस स्टेशन मध्ये गोळबार,मुख्यमंत्री शिदे यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई- (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
कल्याण डोंबिवली शहरात एक धक्कादायक घडना घडली आहे. लोकांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झाला आहे. गोळीबार गुन्हेगारांकडून नाही तर राजकीय नेत्याकडून झाला असल्याने या घटनेला जास्त महत्व आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्येच शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला आहे.
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमधील हा प्रकार आहे.शिवसेना शिदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांच्या एका मित्रावर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलाय. या हल्ल्यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याने थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याने त्यांना कशाचाच धाक राहिला नाही का?
महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये राजकीय शीतयुद्ध सुरु होतं असं सांगितलं जातं. गेल्या काही दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावातील जमिनीवरुन वाद निर्माण झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत शिंदे गटाकडून पाडण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं. याच दरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये हल्ला केला. यादरम्यान पाच ते सहा गोळ्या चालवण्यात आल्या.
महेश गायकवाड कोण आहेत?महेश गायकवाड हे शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख आहेत. कल्याणमधील सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. तरुणांमध्ये ते लोकप्रीय आहेत. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये शहरात राजकीय वाद आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांच्यामध्ये याआधीही वाद झाले आहेत. काही दिवसांपूर्वी महेश गायकवाड यांच्या लावण्यात आलेल्या एका बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला होता.
गणपत गायकवाड कोण आहेत?गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वतून सलग तीनवेळा आमदार आहेत. एकेकाळी गणपत गायकवाड रिक्षा चालवायचे. शिवाय त्यांचा केबलचा देखील व्यवसाय होता. काही काळात त्यांनी राजकीय क्षेत्रात नाव कमावले. सुरुवातीला त्यांनी अपक्ष म्हणून आमदारकी लढवली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं. त्यांचा कल्याणमध्ये जनसंपर्क दांडगा आहे.गणपत गायकवाड यांची हल्ल्यानंतर प्रतिक्रियागणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मला कसलाही पश्चाताप नाही. माझ्या मुलाला पोलीस स्टेशनच्या दारावर धक्काबुकी करण्यात आली. मला सहन झालं नाही म्हणून गोळी चालवली. महेश गायकवाड यांनी जबरदस्ती येऊन दहावर्षांपूर्वी घेतलेल्या आमच्या जागेवर कब्जा केला आहे. मी त्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. पण, ते गुंडगिरी करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी राज्यात गुंड पाळून ठेवले आहेत