केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा : अजित गव्हाणे*

*केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा : अजित गव्हाणे*
केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचे हित साधणारा आहे.
त्यामुळे देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा आणि 2047 पर्यंतच्या विकसित भारताची पायाभरणी करणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे.गरीब, महिला, युवक आणि अन्नदाता शेतकरी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
नवनवीन उद्योगासाठी ५० वर्षे कालावधीचे व्याजमुक्त अर्थसाह्य, राज्य सरकारांना आर्थिक सुधारणांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचे ५० वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणा यामुळे महाराष्ट्राच्या राज्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहेत.
देशात ३ हजार नवीन आयटीआय, ७ आयआयटी, १६ आयआयआयटी, ७ आयआयएम तसेच १५ एम्स आणि ३९० विद्यापीठांची घोषणा उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणारी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारा केंद्रीय अर्थसंकल्प आहे.
