पुणे पोलीस आयुक्तालयात जवळपास 200 ते 300 गुन्हेगार यांची परेड….


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी जवळपास दोनशे ते तीनशे गन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकीच्या आधी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आयुक्तांनी सर्व अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड केली. पुणे शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांवर ज्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे त्यांना सर्वांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलंय. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार ॲक्शन मोडवर आले आहे. पुणे शहरातील नामचीन गुंडांची ओळख परेड काढण्य़ात आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे, निरेश घायवळसह पुण्यातल्या इतर गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांची पोलिसांनी ओळख परेड काढलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील नामचीन गुंडांना पहिलाच दणका दिलाय. पुणे पोलीस आयुक्तालयात जवळपास 200 ते 300 गुन्हेगार यांची परेड करत आयुक्तांकडून सर्वांना तंबी देण्यात आली. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या खूनांमुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे. शरद मोहोळ याची महिन्याआधी भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे टोळीयुद्धाचा भडका उडण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र त्याआधी नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करत करण्यात आलं आहे. गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात हजेरी लावली आहे. रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची आज ओळख परेड करण्यात आलीये. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते.