घड्याळ आपल्याकडे नसलं तरी वेळ आपलीच आहे- रोहित पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा एक सेल झाला आहे. शरद पवार गटाचे नाव आज संध्याकाळी कळेल, चिन्ह आज मिळेल की नाही माहिती नाही. पण जे चिन्ह मिळेल ते सर्वसमान्यांच्या मनातील चिन्ह असेल. घड्याळ आपल्याकडे नसलं तरी वेळ आपलीच आहे. तसेच, नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सन्मान करताना राष्ट्रवादीचा पंचा देता येणार नाही”, असेही रोहित पवार म्हणाले. भाजपकडे पक्ष फोडण्याची ताकद असेल, तर धनगर, लिंगायत आणि इतर समाजाला 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण देण्याची धमक त्यांच्याकडे नाही का?, शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक, गुजरातमध्ये जात असलेल्या उद्योगांना थांबवण्याची धमक या भाजपमध्ये नाही का? , असे म्हणत रोहित पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.  तर, येत्या काळात पक्ष मजबूतीसाठी राज्यभर दौरा केला जाणार असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. मंगळवारी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आलेल्या निर्णयानंतर शरद पवार गटाचा पहिला मेळावा आज जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान याच मेळाव्यात बोलतांना रोहित पवार म्हणाले की, “काल घेतलेला निर्णय संविधानाच्या बाजूने नव्हता. गेल्या काही वर्षांत संविधान बाजूला ठेवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. 2014 ते आतापर्यंत संविधानाला तडा आणण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. दबाव टाकून सर्वच खासदार जर भाजपने स्वतःच्या बाजूने केले, तर भविष्यात निवडणूका होतील की नाही याची शंका आहे. 2024 मध्ये भाजपची सत्ता आली तर पुढच्या निवडणूका लागतील याबाबत देखील शंका आहे. भाजपसोबत गेलेल्या नेत्यांना लोकसभेनंतर स्वतःच्या चिन्हावर नाही, तर भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल. तसेच जयंत पाटलांवर ईडीचा दबाव टाकला जातोय, पण ते लढत असल्याचे”, देखील रोहित पवार म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) विजय निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला असून, याच मेळाव्यात बोलतांना रोहित पवारांनी सूचक वक्तव्य केले आहे. ‘ईडीने मला जेलमध्ये टाकले तरी माझ्या जागी माझं कुटुंब येथून लढेल’, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून रोहित पवारांची ईडीकडून चौकशी सुरु असून, याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

Latest News