पुणे लोकसभा: जर मला काँग्रेस पक्षाने निवडणुक लढविण्याची संधी दिल्यास नक्कीच लढेल – आमदार रविंद्र धंगेकर

पुणे |ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- आता लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि पुन्हा एकदा माझ्या नावाची या निवडणुकीसाठी चर्चा सुरू झाली आहे. जर मला काँग्रेस पक्षाने निवडणुक लढविण्याची संधी दिल्यास नक्कीच लढेल आणि जिंकेल देखील, तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. पण या सर्व चर्चेवर एकच सांगू इच्छितो, आजवर पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी राहिले आहेत आणि लोकसभा निवडणुकीत देखील माझ्या पाठीशी राहतील. त्यामुळे पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांनी लढवावी किंवा त्यांच्या वरीष्ठ नेत्यांनी ही निवडणुक लढवावी, ही निवडणूक मीच जिंकणार, असंही रविंद्र धंगेकर म्हणाले.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून बैठका सुरू आहेत. पुणे लोकसभा निवडणुक देवेंद्र फडणवीस लढविणार अशी चर्चा सुरू आहे. यावरून कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातून देवेंद्र फडणवीस उभे राहिले तरी मीच जिंकणार, असं ते म्हणाले.आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, मी ३० वर्षापासुन राजकीय जीवनात आहे.या संपूर्ण कालावधीत कसबा विधानसभा मतदारसंघात विविध प्रभागातून नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या प्रत्येक निवडणुकीत समाजातील सर्व घटकांनी संधी दिल्याने नगरसेवक म्हणून काम करता आले.त्याच दरम्यान मागील वर्षी झालेली कसबा विधानसभा पोटनिवडणुक सर्व सामान्य नागरिकांनी हातामध्ये घेतल्याने मी आमदार झालो आहे.दरम्यान, पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपकडून जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ,सुनील देवधर,तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे,मोहन जोशी,रविंद्र धंगेकर,मनसेकडून वसंत मोरे,साईनाथ बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दीपक मानकर यांच्या नावाची चर्चा आहे. पण निवडणुक ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होण्याची शक्यता आहे.
