आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्विझ कॉम्पिटिशन’ ला चांगला प्रतिसाद….भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये आयोजन

IMG-20240226-WA0269

*’आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्विझ कॉम्पिटिशन’ ला चांगला प्रतिसाद*………….भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये आयोजन

पुणे :’ आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्विझ कॉम्पिटिशन -२०२४’ चे आयोजन भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज (एरंडवणे, पुणे )येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला

.भारती अभिमत विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला बेंडाळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी उपप्राचार्य डॉ.ज्योती धर्म ,समन्वयक डॉ.विद्या ढेरे उपस्थित होते. विपाशा चिरमुले आणि रश्मी दुबे आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम केले.

ही स्पर्धा २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी एरंडवणे शैक्षणिक संकुलात पार पडली .यावेळी बोलताना डॉ.उज्वला बेंडाळे म्हणाल्या,’ डिजिटलायझेशन पुढे येत असल्यामुळे नवीन जगामध्ये शैक्षणिक क्षेत्रावर त्याचा प्रभाव पडत आहे. विधी शाखेला देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा विचार आणि अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .