अरविंद एज्युकेशन सोसायटीत पर्यावरण संवर्धन आणि वैज्ञानिक प्रयोग सादर करीत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

पिंपरी, प्रतिनिधी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विज्ञानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित प्रयोग सादरीकरण करून विज्ञान दिन साजरा करण्यात आला. विज्ञान प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
          कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रज्ञ सी. व्ही रमन, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, संस्थेचे संस्थापक स्व. नानासाहेब शितोळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी व प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका पिंकी मणिकम, लिटल फ्लॉवर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शीतल मोरे, विज्ञान शिक्षिका प्रतिभा ओक, शिल्पा पालकर, हेमाली जगदाळे, तृप्ती जगताप, अश्विनी वाघमारे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            या प्रदर्शनामध्ये पर्यावरण संवर्धन, न्यूटनच्या गतीविषयक नियमावर आधारित रॉकेट मॉडेल, नैसर्गिक आपत्ती, व्हॅक्युम क्लिनर, साधी यंत्रे, डी. एन.ए. मॉडेल, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल, हायड्रॉलिक ब्रिज, इलेक्ट्रोस्कोप, इलेक्ट्रीक बेल, हरितगृह वायूंचे परिणाम, प्लॅस्टिक रिसायकलींग, होलोग्राम, पीएसएलव्ही माॅडेल, भूकंप मापक यंत्र, पवनचक्की, डोअर लाॅकींग सिस्टीम, ऑड्रीनो सेन्सॉर रोबोट, वाॅटर लेवल इंडिकेटर, ताऱ्यांचे जीवन चक्र, न्यूटन्स क्रॅडल, रॉकेटचे कार्य, लेटर सिक्युरिटी अलार्म, कार्बन प्युरिफायर, कॅलिडोस्कोप, सोलर ट्रॅकर यावर आधारित विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थिनींनी काढलेल्या वैज्ञानिक रांगोळ्या हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. सेल्फी पॉईंटला सेल्फी काढण्याचा आनंदही लुटला. पालकांनी वैज्ञानिक प्रयोगांचे निरीक्षण केले व नवनवीन वैज्ञानिक माहिती जाणून घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रशंसा केली. 
           आरती राव यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व समजावून देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन केले. प्रणव राव यांनी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता स्वतःहून नवनवीन वैज्ञानिक प्रयोग करून शिकत रहावे. तसेच आपले ज्ञान वृद्धिंगत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे सांगितले.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा ओक यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका अश्विनी शिसोदे यांच्यासह उदय फडतरे, भटू शिंदे, अक्षय नाईक, दर्शना बारी यांनी केले.