इस्टेट एजंट असल्याचे भासवून घरातील दागिने, मोबाईल चोरट्याला, तांत्रिक विश्लेशन करून अटक, सहकारनगर पोलीसांची कारवाई

इस्टेट एजंट भासवून घरात घुसून दागिने व मोबाईल चोरट्याला अटक सहकार नगर पोलीस स्टेशन ची कारवाई

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )इस्टेट एजंट असल्याचे भासवुन प्रॉपर्टी विकत घेण्याचे बहाण्याने घरात घुसुन दागिणे व मोबाईल फोन चोरणारा चोरट्याला पोलीस अंमलदार सागर सुतकर यांनी तांत्रिक विश्लेशन करून सदर आरोपीचे ठावठिकाणा ची माहिती घेऊन अटक केली आहे सहकारनगर पोलीस स्टेशन,च्या कर्मचाऱ्यांनि कारवाई केली आहे सुमीत चव्हाण रा. सहकारनगर नं.१ पुणे यांना एक इसम तुमचे घर विकत घेण्यासाठी माझ्याकडे पार्टी असुन त्यांना घर पाहण्यासाठी घेवुन येत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना दुपारी १२.३० वा. ची वेळ दिली व कामासाठी निघुन गेले होते. काम आवरून साधारण दुपारी ०१.३० वा.चे सुमारास घरी आले असता खोलीत टेबलवर ठेवलेला दुसरा अॅपल कंपनीचा आयफोन मोबाईल फोन घेण्यासाठी गेले असता त्यांना मोबाईल फोन मिळुन आला नाही, त्यावेळी त्यांनी त्यांचे आईला मोबाईल मिळुन येत नाही असे विचारले त्यावेळी आईने एक इसम ११.३० वा.चे सुमारास घरी आला होता. तो माझ्या शेजारी बसला व धर पाहुन येतो असे म्हणून आतील खोलीत गेला होता असे फिर्यादी यांना त्यांचे आईने सांगितले.त्यावेळी त्यांना आईच्या गळ्यात तीचे सोन्याचे मंगळसुत्र दिसले नाही त्याबाबत तीला विचारले असता तीने उशीखाली ठेवले होते असे सांगितले. त्यानंतर आईच्या उशाला ठेवलेले तीचे सोन्याचे मंगळसुत्र व आयफोन कंपनीचा मोबाईल फोन चोरून नेल्याची खात्री झाल्याने त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं ६२/२०२४ भा.द.वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्हयाचे तपासाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र माळाळे सहकारनगर पोलीस स्टेशन यांनी मार्गदर्शन व सुचना देवन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश केल्याने सदर गुन्हयाचे अनुषंगाने वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले त्यावरून पोलीस अंमलदार अमोल पवार व विशाल वाघ यांनी बातमीदारामार्फत बातमी मिळवली की सदर सोन्याचे मंगळसुत्र व आयफोन कंपनीचा मोबाईल फोन चोरनारा इसम हा उरुळी कांचन पुणे भागात आहे

अशी खात्रीशिर बातमी मिळालीपोलीस अंमलदार सागर सुतकर यांनी तांत्रिक विश्लेशन करून सदर आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती मिळवुन सदर माहिती सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठांना कळविली असता त्यांनी लागलीच पोलीस अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेतले

अनिल ज्ञानेश्वर मलठणकर वय ५८ वर्षे रा. चाळ नं. २३ घ नं. १७७, आंबेडकर शाळेसमोर, लक्ष्मीनगर पर्वती पुणे असे सांगितले आरोपीची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन १०,०००/- रु किंमतीचा एक अॅप्पल कंपनीचा आयफोन ७ मॉडेलचा मोबाईल फोन व ३६,०००/- रु किंमतीचे एक सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण ४६,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

सदरची कामगीरी , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, विशाल वाघ, सागर सुतकर, बजरंग पवार, किरण कांबळे, महेश मंडलिक, निलेश शिवतारे, नवनाथ शिंद, सागर कुंभार, संजय गायकवाड यांनी केली

Latest News