पुणे लोकसभा निवडणूक पक्षाने विश्वास ठेवल्यास मी सार्थ ठरवेन- काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)
लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी रवींद्र धंगेकर यांनी आपला पत्ता खोलला आहे. गेल्या काही दिवसांपासून रविंद धंगेकर यांचे उमेदवारीसाठी चर्चेत असतानाच त्यांनी जाहीरपणे उमेदवारी मागितली आहे
माझ्या पक्षाकडे मी उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाने विश्वास ठेवल्यास मी तो नक्की सार्थ ठरवेन. ते पुढे म्हणाले की सातत्याने नऊ वेळा मी निवडणूक लढलो असून लोकांनी विश्वास ठेवला आहे. दरम्यान, पक्षाने अजूनही कोणत्याही प्रकारची तयारी करायला सांगितले नसल्याचे स्पष्ट केले.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आले असता रविंद्र धंगेकर यांनी भूमिका स्पष्ट केली
माझा डीएनए छत्रपतींचा आहे. छत्रपतींनी सर्व समावेश स्वराज्य उभा केलं. त्यांच्याच भागात मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले