आशियातील युनिव्हर्सिटी वूमन्स असोसिएशन ‘ चर्चासत्राला प्रतिसाद..


‘युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन’ ची आंतरराष्ट्रीय परिषद
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
‘इंडियन फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन’ आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘आशियातील युनिव्हर्सिटी वूमन्स असोसिएशन ‘या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात भारत,जपान,थायलंड,हॉन्गकॉन्, नेपाळ या देशातील प्रतिनिधी सहभागी झाले.त्यात शिझुको सुझुकी, टिको नाकामीची, डॉ.आंब्रिन अशर, श्रीमती केंगास यांचा समावेश होता.मोहिनी शर्मा, एड .गौरी छाब्रिया यांनी स्वागत केले.अडीच वाजता ‘सस्टेनेबिलिटी प्रोजेक्ट्स’ विषयावर सादरीकरणे झाली.नीलम जगदाळे यांनी ‘युनिव्हर्सिटी वुमेन्स असोसिएशन, पुणे’ च्या कार्याचा आढावा घेवून पुढील उपक्रमांची माहिती दिली.असोसिएशनने शैक्षणिक क्षेत्र,महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.डॉ.मुक्ता करमरकर यांनी सूत्रसंचालन केले.त्यावेळी डॉ रंजना बॅनर्जी, डॉ.उज्वला शिंदे,एड. प्रेमा कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.’वर्किंग टुगेदर फॉर सस्टेनेबल फ्युचर’ ही या परिषदेची संकल्पना होती.