मावळ लोकसभा निवडणुकीत देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खासदार म्हणून मी निवडून येईल- संजोग वाघेरे


पिंपरी | ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
विरोधक कमळाच्या चिन्हावर लढल्यास उलट निवडणूक सोपी होईल. कारण भाजपच्या विरोधात सुप्त लाट आहे. याचा फायदा मला होईल. मतदान करताना ते शिवसेनेला करतील. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला गेल्याने नागरिक नाराज आहेत. महागाईने नागरिक त्रस्त आहेत, असंही संजोग वाघेरे म्हणालेदरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. परंतु, महायुतीचा उमेदवार हा कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडणार असल्याचे बोलले जात आहे.उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा निवडणुतीचा उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरे गटाकडून मावळमध्ये संजोग वाघेरे हे उमेदवार असणार आहेत. उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजोग वाघेरे यांनी प्रचारास सुरूवात केली आहे. यावेळी त्यांनी मावळमधून गद्दारांचा पराभव करून खासदार होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.संजोग वाघेरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी उरणच्या सभेत उमेदवारी जाहीर केली. मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा राहिलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खासदार म्हणून मी निवडून येईल, अशी मला खात्री आहे