ईडीची गैरवापर: २०१४ ते २०२२ या काळात भाजपच्या सरकारने देशात १३१ जणांवर कारवाई मात्र एक ही भाजपा नेता नाही


पुणे: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- )
पवार म्हणाले, सन २०१४ ते २०२२ या काळात भाजपच्या सरकारने देशात १३१ जणांवर कारवाई केली. त्यामध्ये भाजपचा एकही मंत्री नाही. काँग्रेसने सन २०१४ ते २०१४ या काळात २६ कारवाया केल्या. त्यात ५ काँग्रेसचेच मंत्री होते. याचा अर्थ डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ईडीची गैरवापर झाला नाही असा तर आहेच, पण यांच्या काळात ईडी आयुधासारखी वापरली जात आहे असाही आहे.
भारतीय जनता पक्षाकडून वारंवार लोकसभा निवडणूकीत यंदा ४०० पार असा सांगितले जात आहे. राज्यघटनेत बदल करण्यासाठीच त्यांना ही संख्या गाठायची आहे असे त्यांच्याच एका वजनदार मंत्र्यांचे अलीकडेच सांगितले
. मोदी बाग या पुण्यातील निवासस्थानी पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी भाजपला लक्ष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) राज्य प्रवक्ते तसेच खासदार वंदना चव्हाण यावेळी उपस्थित होते.
राजकीय हेतूने, सुडापोटी या गोष्टी केल्या जात आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार संजय राऊत यांच्या कारवाईत काय आढळले? विरोधी पक्षाच्या अनेक उमेदवारांवर त्यांनी निवडणुकीला उभेच राहू नये यासाठी इडीचा दबाव टाकला जात आहे. आमदार रोहित पवार यांच्यावरील कारवाई तेच सांगते आहे.
रविंद्र वायकर शिंदे गटात केले. त्यांच्याविरोधात कारवाई सुरू होती, आता ती थांबली. हा प्रकार काय आहे? असा प्रश्न पवार यांनी केला. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ पवार यांनी इडीच्या कारवाईची आकडेवारी असलेली कागदपत्रेच पत्रकार परिषदेत सादर केली.