फेसबुक पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी आपण मनसे पक्षातून राजीनामा….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- वसंत मोरे यांचे पहिल्यांदा मी अभिनंदन करते. लोकांच्या हक्कासाठी हातोडा घेऊन जाणारा नेता हतबल झालेला पाहून मला वाईट वाटत होतं. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी अनेक गोष्टी सहन केल्या होत्या. हा निर्णय घ्यायला त्यांनी उशीरच केला, असंच मी म्हणेण.”लोकांची पसंत असलेले, मोरे वसंत, मनसेला नव्हते पसंत”, अशा शब्दात मनसेच्या माजी नेत्या आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी वसंत मोरेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आपले स्वागत करू, असे सांगून रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रणच दिले आहे. पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. साहेब मला माफ करा अशी फेसबुक पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी आपण मनसे पक्षातून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.पक्षांतर्गंत राजकारणाला कंटाळून आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.पत्रकार परिषदेत आपल्या भावना मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. वसंत मोरेंच्या राजीनाम्याबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून, मनसेच्या पुर्वाश्रमीच्या पुण्यातीलच नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी एका छोट्याश्या कवितेतून आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.