पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली, राजेंद्र भोसले नवीन पालिका आयुक्त असणार


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
महापालिका निवडणूक न झाल्याने आयुक्तांनी पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची आज बदली (Pune) करण्यात आली आहे. राजेंद्र भोसले आता नवीन आयुक्त असणार आहे. तशा प्रकारचे आदेश शासनातर्फे जारी करण्यात आले आहे
निवडणुकीची आचारसंहिता लागणार म्हटल्यावर कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. पुणे महापालिकेत मागील 2 वर्षांपासून विक्रम कुमार प्रशासक म्हणून काम पाहत होते
. .विक्रम कुमार यांनी नुकतेच 11 हजार कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. त्यामध्ये पुणे शहरात असलेल्या विविध मोठमोठ्या प्रकल्पांचा गवगवा करण्यात आला होता. त्यांच्या कार्यकाळात समान पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना, समाविष्ट गावांचा विकास, अशा विविध प्रकल्पांना गती देण्यात आली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली.
* विक्रम कुमार (IAS:MH:2004) महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांची अतिरिक्त महानगर आयुक्त, MMRDA, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
* डॉ. राजेंद्र भोसले (IAS:MH:2008) यांची महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
* लहू माळी (IAS:MH:2009) यांची संचालक, आपत्ती व्यवस्थापन, R&FD, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
* कैलाश पगारे (IAS:MH:2010) व्यवस्थापकीय संचालक, M.S. कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांची एकात्मिक आदिवासी विकास योजना, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली (Pune) आहे.