26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार अन्यथा आमची भूमिका जाहीर करणार.:वंचित नेते बाळासाहेब आंबेडकर

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

महाविकास आघाडीचा तिढा मिटणार नसेल तर आमची एन्ट्री होऊन काय उपयोग आहे. आज सकाळी आम्ही सांगितले आहे. 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार अन्यथा आमची भूमिका जाहीर करणार आहोत अशी भूमिका . प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषेदेत मांडली

यामध्ये काँग्रेसला सात जागांना पाठिंबा देऊ. त्यांचा जमलं नाही तर आम्ही काँग्रेसला चॉईस दिली आहे. जर त्यांचा जमलं नाही तर प्रत्येकाला 48 जागा लढवावी लागतील. त्यात काँग्रेस 48 जागा लढत असेल तर सात जागांना आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे. हा निर्णय तिन्ही पक्षांकडून घेण्यात आला आहे. शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीने सर्व प्रयत्न केले जातील. मागे जे घडलं ते यावेळी न घडू द्यायचे नाही, याची दक्षता घेण्यात येईल.

आम्हाला चार जागा कधीच ऑफर केल्या गेल्या नाहीत. महाविकास आघाडी कडून आम्हाला फक्त तीन जागा ऑफर केले गेल्या.

त्यातील एक जागा अकोल्याची होती. आम्ही काय म्हणतोय कॅरी करण्यापेक्षा संजय राऊत काय म्हणतात हे जास्त कॅरी केले जातय, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. 

“महाविकास आघाडीचा तिढा तो त्यांनाच तुम्ही विचारा. आम्हाला काहीच माहिती नाही. प्रकाश शेंडगे यांनी नव्या पक्षाची नोंदणी केली आहे. त्यांनी एक यादी आमच्याकडे सादर केली आहे. आमचंच घोंगड भिजत आहे. त्यामुळे आम्ही फायनल ठरु शकत नाही. पुढील चर्चा कायम राहिल, असं आम्ही ठरवलेलं आहे

. तुम्ही आम्हाला सहकार्य केलं असतं तर घोंगड भिजत पडलं नसतं. तुम्ही आम्हाला टार्गेट केलं म्हणून त्यांना त्यांच कोंबड झाकता आलं. त्यांच कोंबड आता बांग देऊ लागलय. 10 जागांवरुन सेनेत आणि काँग्रेसमध्ये वाद आहे. 5 जागांवर तिन्हा पक्षांमध्ये टाय आहे”,असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. 

Latest News