PCMC: सुट्टी असली तरी 31 मार्चपर्यंत कर संकलन कार्यालये सुरुच राहणार…

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)-

कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने कर वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही कर भरता यावा, यासाठी 31 मार्चपर्यंत कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आजही कार्यालये सुरू आहेत

पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी 17 विभागीय कार्यालये आणि ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत 865 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे.

1 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव करणे,  यासारख्या कठोर कारवाया केल्या जात आहेत

. त्यामुळेच कर भरणा वाढला आहे.नागरिकांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे.  सुट्टी असली तरी 31 मार्चपर्यंत  दिवशी कर संकलन कार्यालये सुरुच ठेवण्यात येणार आहेत. शनिवार, रविवारीही कार्यालये सुरू राहणार आहेत.