PMRD कडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले बोगस प्रतिज्ञापत्र, सामाजिक कार्यकर्त्यांना गुंडाची उपमा ! चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी!!:मारुती भापकर


PMRD कडून सामाजिक कार्यकर्त्यांना गुंडाची उपमा!! मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले बोगस प्रतिज्ञापत्र, PMRD आयुक्त राहुल महिवाल यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी!!:मारुती भापकर
पिंपरी (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना )
PMRD च्या विरोधात आंदोलन करतानाही आम्ही कधीही गुंडगिरीचा वापर केलेला नाही. अशी वस्तुस्थिती असताना पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांनी बिल्डरांकडून मलिदा घेऊन .आमच्या विरोधात मुबंई उच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून आमची प्रतिमा खराब केली आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने बोगस प्रतिज्ञापत्राची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहरातील सर्वं सामाजिक कार्यकर्त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे
पीएमआरडीए प्रशासनाने दीड वर्षांपूर्वी सर्वं नं 24 येथील हा भूखंड प्लॉट पाडून फक्त बिल्डर लॉबीला भूखंड घशात घालण्यासाठी ई-निविदा पद्धतीने विक्री केला.
कोणत्याही प्रकारांची दादागिरी किंवा गुंडगिरी केली नाही चिंचवड शहरातील निगडी येथील भक्ती शक्ती समुहशिल्प ही आमच्या शहराची ओळख आहे. पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल व त्यांच्या प्रशासनाने यापूर्वी मुख्यमंत्र्यांना अहवाल देताना बिल्डरांकडून पैसे घेऊन खोटा व दिशाभूल करणारा अहवाल दिलेला आहे असा ही आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे
प्लॉट चा वापर सामाजिक कामासाठी उपक्रमासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी, निगडी गावठाण जत्रा उत्सव यासाठी हा भूखंड कायमस्वरूपी खुला रहावा या मागणीसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मागील वर्षभर सनदशीर, संविधानिक, लोकशाही पद्धतीने, अहिंसक मागनि वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली आहेत
PMRD ने मुख्यमंत्र्यांना सर्व बाबी अवगत केलेला नाही. तसेच पूर्वीचे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पीएमआरडीए मध्ये विलीन करताना या विलीनीकरणाला विरोध करणारी जनहित याचिका तत्कालीन आमदार के लक्ष्मण जगताप यांच्या जनहित याचिकेचा उल्लेख त्यांच्या अहवाला ते टाळत आहेत.
आम्हा आंदोलन करणाऱ्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांची बदनामी करणारे आहे. या याचिकेतील पान क्रमांक २७०,२७२ वर आम्हाला गुंड, गुंडांची टोळी म्हणून श्री महिवाल व श्री ठाकरे या चोर व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संबोधले आहे या चोर व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बिल्डर्स करून पैसे घेऊन प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर करून उच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली आहे.
आम्ही आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना गुंडगिरी करून आंदोलन केले असेल तर पीएमआरडीए प्रशासनाने आमच्यावर आतापर्यंत किती गुन्हे दाखल केले यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे या वेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे भाऊसाहेब अडागळे,माजी नगरसेवक सचिन चिखले, सागर तापकीर, जीवन बोराडे, शिवाजी साळवे, सचिन बोराडे, काशिनाथ नखाते, आभिषेक म्हस्के, आदी उपस्तित होते