मौखिक परंपरेतून दिसणा-या सामाजिक इतिहासाकडे डोळेझाक नको – जितेंद्र मैड


मौखिक परंपरेतून दिसणा-या सामाजिक इतिहासाकडे डोळेझाक नको – जितेंद्र मैड
पुणे: दि.३०’संत तुकाराम महाराजांचे अभंग समाजमनात तरले त्यामध्ये मौखिक परंपरेचा मोठा वाटा आहे. मौखिक परंपरेतून दिसणारा सामाजिक इतिहास अनेक ऐतिहासिक घटनावर प्रकाशझोत टाकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष नको’, असे मत मौखिक परंपरेचे अभ्यासक जितेंद्र मैड यांनी व्यक्त केले
. संत तुकाराम महाराज विचार व्यासपीठाने गांधी भवन कोथरुड येथे तीन दिवसीय ‘तुका झालासे कळस’ या संत तुकाराम महाराज बीज निमित्त आयोजित विचार मंथन कार्यक्रमात मैड बोलत होते. पंडीत यादवराज फड, हभप चंद्रकांत महाराज वांजळे, डॉ. संदीप बुटाला, गिरीश खत्री, महेश रायरीकर, रोटरीयन किरण इंगळे, प्रतिभा जगदाळे, माजी तहसिलदार आशा माने, उमेश कंधारे, तान्हाजी निम्हण, दिलीप बोकील, संगिता जगताप आदी उपस्थित होते.
सीताराम बाजारे यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांचा दाखला देत त्यांचे विचार भेदाभेद, विषमता नष्ट करणारे, अनिष्ठ प्रथा परंपरांवर आघात करणारे, समाजाला समानतेकडे नेणारे होते यावर भाष्य केले.
तुकाराम महाराजांच्या विचारांचा धागा महात्मा फुले, महात्मा गांधी, विनोबा भावे, रविंद्रनाथ टागोर आदींनी घेतला. त्यांच्या अभंगाचे २५ हून अधिक भाषात भाषांतर झालेले आहे
. ८० हून अधिक देशात त्यांच्या विचाराचा प्रसार झाला आहे. त्यामुळे खरच ते जगदगुरु ठरतात.प्रा. दत्ता शिंदे यांनी, ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ या अभंगाचा दाखला देत तुकाराम महाराजांनी दुष्काळात व अडीअडचणीच्या काळात लोकांना कशी मदत केली
,याचे उदाहरण दिले. बोले तैसा चाले असे वागणारे होते. म्हणूनच समाजाला ते वंदनीय ठरतात. बबाबाई लायगुडे, अंजना शेडगे, कुसुम सोनवणे, लीलाबाई कांबळे, चिंतामण उतळे यांनी मौखिक परंपरेतील गाणी सांगत तुकाराम महाराजांच्या विचाराचे बीज समाज मनावर कसे खोलवर रुजलेले आहे याची उदाहरणे सांगितली. सुत्रसंचालन अँड. शिवाजी भोईटे यांनी केले. स्वागत प्रा. सागर शेडगे यांनी केले. आभार अनंत सुतार यांनी मानले. ……