PCMC: आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त व संपूर्ण प्रशासनाची आहे. -आप’चे शहर संघटनमंत्री ब्रह्मानंद जाधव

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त व संपूर्ण प्रशासनाची आहे. त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधितांवर निवडणूक आयोगाने कड़क कारवाई करावी, अशी मागणी ब्रह्मानंद जाधव यांनी केली आहे.महापालिकेच्या अधिका-यांनी नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शालेय साहित्याबाबत यामध्ये उल्लेख करण्यात आला होता. त्यासाठी काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया, सध्य:स्थिती, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणारी प्रक्रिया, साहित्य कसे मिळणार, त्यासाठी पालकांनी काय करायचे, याबाबत माहिती देण्यात आली होती, यावर आक्षेप घेण्यात आले आहेत.लोकसभा निवडणूक सुरू असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून विविध धोरणात्मक निर्णय जाहीर करून, तसेच घोषणा करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला जात आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी तक्रार आम आदमी पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.यासंदर्भात ‘आप’चे शहर संघटनमंत्री ब्रह्मानंद जाधव यांनी तक्रार केली आहे त्यांनी म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यक्षेत्र मावळ, शिरूर आणि बारामती अशा तीन लोकसभा मतदारसंघांत विभागलेले आहे. प्रशासनातील अतिरिक्त आयुक्त, विभागप्रमुख आणि इतर अधिकारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे वेगवेगळ्या घोषणा करून या तिन्ही विधानसभा मतदार संघावर प्रभाव टाकत असा आमचे मत आहे.

Latest News