पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने दिग्विजय योद्धा पगडी मोदींना देण्यात येणार आहे.

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरले आहेत. भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदींचा दिग्विजय योद्धा पगडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने ही पगडी मोदींना देण्यात येणार आहे. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून ही विशेष पगडी तयार करण्यात आली आहे.महाराष्ट्रात आज सातारा, सोलापूर आणि पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. पुण्यात रेसकोर्सच्या मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास २ लाख नागरिक सभेला उपस्थित राहणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत. २१ विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार आहेत. या सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून गुगल लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांचे पार्किंग कोठे आहे ते त्यांना समजेल. कार्यकर्त्यांनी येताना पाण्याची बाटली आणू नये. पाण्याची सोय मैदानात करण्यात आली आहे. २२ ठिकाणी एलईडी लावण्यात येणार आहेत. मुरुडकर यांच्या वतीने सुरेख अशी लाल रंगाची पारंपरिक पुरातन पद्धतीने हाताने बांधलेली पगडी तयार करण्यात आली आहे. हवा खेळती रहाण्याची सोय आहे. पंचधातूचा वापर करून बनवलेली शुभ चिन्हे, आई तुळजाभवानीची प्रतिमा पगडीवर आहे. ही पगडी पूर्णपणे एअर कंडीशन आहे. रिसर्च टीमने पूर्ण अभ्यास करुन ही पगडी तयार केली असल्याचे मुरुडकर यांनी सांगितले आहे. दिग्विज्याला साजेस सात घोड्यांचा राजेशाही स्टॅन्ड असणारी मराठा युद्धांच्या पराक्रमाची साक्ष देणारी मराठा दिग्विजय पगडी मोदी यांच्या सन्मान करण्यासाठी बनवण्यात आली आहे.

Latest News