: मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून आजच मतदान केंद्राची माहिती घ्या.

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप करण्यात येत आहे. मतदार चिठ्ठी मिळाली नसल्यास जवळच्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जिल्हा निवडणूक प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वॉर्डनिहाय तसेच विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदार सहाय्यता केंद्र स्थापन केले आहे

. या केंद्राची मदत घेवून मतदान केंद्राची माहिती(Loksabha Election) घेता येईल.जिल्ह्यातील मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार (दि. 13 मे) रोजी मतदान होणार असून मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.

मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून आजच मतदान केंद्राची माहिती(Loksabha Election) करून घ्या.पुणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघात 7 लाख 14 हजार 273 पुरुष तर 6 लाख 47 हजार 31 महिला मतदार असून एकूण 13 लाख 61 हजार 392 मतदार आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात 10 लाख 55 हजार 62 पुरुष व 10 लाख 355 स्त्री असे एकूण 20 लाख 55 हजार 741 मतदार आहेत तर शिरुर लोकसभा मतदारसंघात 13 लाख 33 हजार 890 पुरुष व 11 लाख 99 हजार 997 महिला असे एकूण 25 लाख 34 हजार 88 मतदार आहेत.

मतदारांच्या सोयीसाठी 1950 हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला असून यावरुन मतदार यादीतील नावाची माहिती घेता येईल

https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावरदेखील मतदाराचा तपशील शोधता येणार आहे.  वोटर हेल्पलाईन ॲपवरदेखील ही सुविधा आहे.

Latest News