धक्कादायक: उजनी धरण पात्रात प्रवासी बोट बुडाली; एकाचा जीव वाचला, सहाजण बेपत्ता


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
आतापर्यंत सहा प्रवाशांची कुठलीच माहिती समोर आलेली नाही. रात्री शोध मोहिमेत अडथळे आले. रात्री जवळपास 9 वाजता शोध मोहिम थांबविण्यात आली. आज सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. NDRF ची टीम कळशी गावात पोहचली आणि तिने शोध मोहिम सुरु केली आहे. शोध मोहिमेसंबंधीचा एक व्हिडिओ पण समोर आला आहेकरमाळा तालुक्यातील कुगाव येथील सात जणं बोटीने इंदापूर तालुक्यातील कळशी येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान जोरदार हवेने प्रवासात अडथळे येत होते. वादळीवाऱ्याने ही बोट उलटली. बोट भीमा नदीत बुडाली. या नावेत एकूण सात प्रवासी होते. त्यात एक वर्षांचे मुल असल्याचे समोर येत आहे. त्यातील एक प्रवाशी पोहता येत असल्याने पोहत किनाऱ्यावर आला. वादळी वारे आणि जोरदार पावसाने हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.उजणी धरणाच्या पात्रात, भीमा नदीत काल संध्याकाळी वाहतूक करणारी बोट उलटली. वादळीवाऱ्याने हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या घटनेतील 6 जण अद्याप बेपत्ता आहेत. तर एक जणाला पोहता येत असल्याने तो किनाऱ्यावर पोहचला. NDRF पथक या ठिकाणी पोहचले आहे. पथकाकडून शोध मोहिम राबविण्यात येत आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी येथे संध्याकाळी ही घटना घडली होती. दरम्यान उजनी जलाशयात बुडालेले लाँच सापडली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शोध मोहीम करणाऱ्या 3 लाँच व NDRF टीम एकाच जागी असून ही बुडालेले लाँच कळाशी या ठिकाणी ओढून नेण्यास सुरुवात केल्याची प्राथमिक माहिती प्राथमिक माहिती मिळाली आहे.पुणे ग्रामीण पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी व्यापक शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि पोलिस शोध मोहिमेत सहभागी आहेत. दुर्घटनेवेळी चार पुरुष, दोन महिला आणि दोन छोट्या मुलींसह एकूण 8 प्रवाशी या बोटीत होते. त्यातील एक जण पोहता येत असल्याने वाचला.
हे सहा जण बेपत्ता
- 1) कृष्णा दत्तू जाधव 28 वर्ष
- 2) कोमल कृष्णा जाधव 25 वर्ष
- 3) वैभवी कृष्णा जाधव 2.5 वर्ष
- 4) समर्थ कृष्णा जाधव 1 वर्ष रा. झरे ता. करमाळा
- 5) गौरव धनंजय डोंगरे 21 वर्ष
- 6) अनिकेत ज्ञानदेव अवघडे 21 वर्ष रा कुगांव. ता. करमाळा