PCMC: दीड महिन्यातच दाेनशे काेटींचा महसूल महापालिका तिजाेरीत जमा…


सब हेड- 25 टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर सब हेड- दहा ते वीस टक्के सवलत, कर सवलतीच्या योजनांचा लाभ घ्य सब हेड- आयुक्त शेखर सिंह यांचे मालमत्ताधारकांना आवाहन
पिंपरी-चिंचवड ऑनलाईन परिवर्तनाचा सामना– पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींवर सामान्य करात 30 टक्के, दिव्यांगाना 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. माजी सैनिकांना 100 टक्के सवलत लागू आहे. यापूर्वी लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. तसेच 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अवघ्या दीड महिन्यात 25 टक्के मालमत्ता धारकांनी दाेनशे काेटी रूपयांचा कर महापालिका तिजाेरीत जमा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी 30 जूनपर्यंत विविध मालमत्ता कर सवलतीच्या लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळ्या जमीन, मिश्र अशा सहा लाख 28 हजार मालमत्ता आहेत. नागरिकांना मालमत्ता कराचा घरबसल्या भरणा करता यावा, यासह सर्व सेवा सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 30 जूनपर्यंत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. गतवर्षाप्रमाणे यंदाही महापालिकेने महिला बचत गटामार्फत बिलांचे वेळेत वाटप केले आहे. मालमत्ताधारकांना बिल मिळताच कर भरण्यास ते प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच अवघ्या दीड महिन्यात 1 लाख 81 हजार 968 मालमत्ता धारकांनी तब्बल दाेनशे काेटी 39 लाख रूपयांचा कर भरणा केला आहे.
चौकट
पर्यावरण पूरक हौसिंग सोसायट्यांनी सवलतीचा लाभासाठी त्वरित अर्ज करावेत
शहरातील पर्यावरण पूरक हौसिंग सोसायट्यांनी सवलतीचा लाभ घेण्यासाठी लवकर अर्ज करावेत. जेणेकरून अशा सोसायट्यांना आगाऊ कर भरण्याचा आणि पर्यावरण पूरक सवलतीचा एकत्र लाभ घेता येईल.
चौकट
अशा आहेत विविध ‘कर सवलत योजना’
मालमत्तांचा प्रकार सवलत मिळणारी टक्केवारी
आगाऊ मालमत्ता कर 5 टक्के
महिलांचे नाव असलेल्या निवासी घरास 30 टक्के
40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व
असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर मालमत्तेस 50 टक्के
स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी यांचे यांच्या एका निवासी घरास 50 टक्के ऑनलाइन कराचा भरणा करणाऱ्यांना 30 जूनपर्यंत 5 टक्के
जुलै ते सप्टेंबरअखेर पर्यंत भरणा करणाऱ्या 4 टक्के
स्वयंफूर्तीने माझी मालमत्ता माझी आकारणी योजनेअंतर्गत मालमत्तांची नोंदणी केल्यास 5 टक्के
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास 2 टक्के
संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांना मालमत्ताकरात 100 टक्के
चालू आर्थिक वर्षात आकारणी पुस्तकात नवीन नोंद होणाऱ्या निवासी, बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जागा यांना सामान्य करात 5 टक्के
कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट, रेन वाॅटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा संकल्पना राबविणाऱ्या इमारतींमधील निवासी मालमत्तांना 5 पासून 10 टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्रीन बिल्डिंग रेटींग तीन ते पाच रेटींगपर्यंत 5 पासून 15 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.
चाैकट
असा आला कर
आँनलाइन – 132 काेटी 92 लाख
राेख – 12 काेटी 14 लाख 64 हजार
धऩादेश – 8 काेटी 6 लाख 51 हजार
आरटीजीएस – 1 काेटी 22 लाख 44 हजार
डीडी – 49 लाख 30 हजार
एनएफटी – 4 काेटी 39 लाख 20 हजार
विविध अँप- 4 काेटी 92 लाख 52 हजार
चाैकट
दीड महिन्यात मालमत्ता धारकांनी असा घेतला सवलतीचा लाभ
सवलत तपशील लाभ घेतलेल्यांची संख्या भरणा रक्कम भरणा रक्कम
माजी सैनिक – 2085 18355909 4838464
ऑनलाइन भरणा – 144978 110264954 1578161709
जनरल – 19543 5187679 198633706
अंध, अपंग – 738 1914050 4124515
महिला – 7538 14630588 56610083
एकूण – 174883 150389406 1842381875
चाैकट
पर्यावरण पूरक साेसायटी सवलत तपशील
सवलतीचे नाव सवलत घेतल्यांची संख्या भरणा रकक्म सवलत रक्कम
ऑनसाइट कंपाेस्टींग -…