2024 Loksabha: मतमोजणी केंद्रात व त्याच्या 100 मीटर परिसरात 4 जून रोजी पहाटे 12 ते मतमोजणी संपेपर्यंत आदेश लागू….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रात आणि 100 मीटर परिसरात सदर वेळेत भ्रमणध्वनी, लॅपटॉप, आयपॅड, मॅचबॉक्स, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, कोणत्याही प्रकारची शस्त्रे सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणी कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस जवळ बाळगणे व वापरण्यास फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये मनाई करण्यात आली आहे.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 आणि भारतीय दंड विधान कायद्यातील कलम 188 प्रमाणे दंडनीय कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मतमोजणी केंद्रात व त्याच्या 100 मीटर परिसरात 4 जून रोजी पहाटे 12 ते मतमोजणी संपेपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मनाई आदेश निर्गमित(Loksabha Election) केले आहे.मावळ लोकसभा मतदारसंघाची मजमोजणी बालेवाडी स्टेडीयम, पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एफसीआय गोडाऊन कोरेगांव पार्क तर शिरुर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी स्टेट वेअरहाऊस, ब्लॉक पी-३39, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ रांजणगाव (कारेगांव), ता. शिरूर येथे होणार आहे