सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांसमोर हप्त्यांची यादी वाचली….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-पुणे शहरात अवैध सुरु असलेल्या पबसंदर्भात जाब विचारत होते. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर पब सुरु आहे. परंतु त्याच्यावर हप्तेवसुलीमुळे कारवाई होत नाही. आमच्याबरोबर चला, आम्ही तुम्हाला बेकायदेशी सुरु असलेले पब दाखवतो, असे त्यांनी म्हटले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत
तसेच कोणत्या पबकडून महिन्याला किती वसुली होती, त्याची यादी पुन्हा वाचून दाखवली. आपण हप्ते घेतानाचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहे. पुणेकरांसाठी तुम्ही कारवाई करा, असे या नेत्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले
हप्ते वसुलीचा आरोप चुकीचा आहे, असा दावा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह राजपूत यांनी केला. शहरात कुठे बेकायदेशीर बार तर आपण चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आठ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. पब, बार, हॉटेल मालकावर गेल्या वर्षापेक्षा दुप्पट गुन्हे दाखल झाले आहेत.
या वर्षी १७ परवाने निलंबित करण्यात आले आहे. वर्षभरात 100 पेक्षा जास्त बारवर कारवाई करण्यात आली आहे. दोन परवाने कायमस्वरुपी बंद केले आहे. पुण्यातील 54 बार सील केले आहेत,
असे राजपूत यांनी सांगितले.पुणे शहरातील पब संस्कृती पोलिसांच्या आशीर्वादामुळे सुरु आहे. या प्रकरणात कोणत्या पबकडून किती हप्ते घेतले जात आहे, त्याची यादी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांसमोर आंदोलन केले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ही हप्त्यांची यादी सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी वाचली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले. परंतु आपल्याकडे व्हिडिओ आहेत, असा दावा दोन्ही नेत्यांनी केला. येत्या ४८ तासांत बेकायदेशीर पबवर कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.