संदीप वाघेरे हे क्रियाशील नेतृत्व – खासदार बारणे

1445 विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप…

प्रतिनिधी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याचे काम नगरसेवक संदीप वाघेरे करीत आहेत सलग १४ वर्षे अविरतपणे चालणाऱ्या या उपक्रमांचे कौतुक करीत संदीप वाघेरे हे क्रियाशील नेतृत्व आहेत असे गौरौद्गार खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले. तसेच विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावेत तरच भविष्याची वाटचाल सुकर होऊ शकते कोणत्याही क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यासाठी सातत्य ठेवणे गरजेचे असते अस आपल्या मनोगतात सांगितलं.पिंपरी येथील संदीप वाघेरे युवामंच च्या वतीने आयोजित इयत्ता दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ तसेच इयत्ता जुनिअर के. जी. ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप समारंभ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी केलेल्या चमकदार कामगिरीचे सर्वच मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना जेष्ठ विचारवंत करियर मार्गदर्शन व्याख्याते श्री.वसंतजी हंकारे(सर) यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी इयत्ता १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यामध्ये अभिनव बालन या विद्यार्थ्यास लॅपटॉप तसेच श्रद्धा जगदाळे व सोमा सृष्टी यांना टॅब तसेच दीक्षा कापसे, यश मदने या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग तसेच इयत्ता १२ वीच्या मास्करेंस श्रेयल या विद्यार्थीनीस लॅपटॉप तसेच आछरा चारू व भूमिका हुंदलानी यांना टॅब पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला तसेच इयत्ता ज्युनिअर केजी ते इयत्ता ८ वीच्या सुमारे १४४५ गरीब गरजू वियार्थ्याना मोफत शालेय साहित्य ( वह्या कंपास ) चे वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी संदिप वाघेरे युवा मंचच्या वतीने वर्षभरात होणाऱ्या विविध उपक्रमांची नगसेवक संदिप वाघेरे यांनी दिली. पिंपरी व पिंपरी परीसरातील विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी मी सदोदीत कसोशीने प्रयत्न करत असतो याच बरोबर कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम घेवून परिसरातील विविध क्षेत्रातील प्रोत्साहन देण्याचे काम वर्षभर सुरु असते. याचबरोबर मागील ७ वर्षामध्ये जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून मी दिलेले वचन नाम्यातील सर्व कामे पूर्ण केल्याचा मला व माझ्या सहकार्यांना सार्थ अभिमान आहे. पिंपरी वाघेरे गाव ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे, तिच्या विकासासाठी व नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध आहे अशी भावना वाघेरे यांनी व्यक्त केली. समाजात अनेक लोक असतात परंतु दातृत्व कमी जणांकडे असते संदीप वाघेरे हे ख-या अर्थाने सर्वसामान्यांना मदत करणारे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करणारे दानशूर आहेत असे मनोगत भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केले. विद्यार्थाना मार्गदर्शन करताना वसंत हंकारे म्हणाले कि, आयुष्याला न्याय द्यायचा असेल तर विध्यार्थानी स्वतःला ओळखले पाहिजे. आई वडिलांनी दिलेले संस्कार न विसरता समाजामध्ये आपले स्थान निर्माण केले पाहिजे. आपण आई वडिल विसरत चाललो आहोत. असे कोणतेच काम करू नका ज्यामुळे आपल्या आईवडिलांची माना शरमेने खाली जाईल. सध्याचे युग हे सोशल मिडिया, मोबाईल, इंटरनेटचे आहे. यामुळे किशोरवयीन मुले व मुलींच्या मनावर विचीत्र परिणाम होत आहे. या गोंधळालेल्या स्थितीतून स्थावरण्यासाठी त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. मुले चांगले विचार आत्मसात करतील, नेव्हाच समाजाचे चित्र बदलेल. संगत आणि पंगत कोणाची आहे याचा विचार करुन आयुष्य सार्थकी लावा असा संदेश हंकारे यांनी विद्यार्थांना दिला. कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे,भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, नोव्हेल स्कूलचे संस्थापक अमित गोरखे, माजी नगरसेवक शीतल शिंदे,भाजप विस्तारक नंदू कदम,मीना नाणेकर,वस्ताद दत्तोबा नाणेकर श्रीरंग शिंदे,किसन कापसे पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे शांताराम सातव,कैलास भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमांचे नियोजन युवा मंचचे अध्यक्ष हरीष वाघेरे, शरद कोतकर , सचिन वाघेरे , रंजना जाधव, गणेश मंजाळ, शीतल पोतदार, समीक्षा चिकणे, कीर्ती वाळुंजकर, प्रीती साळे, चैताली विलकर, विठ्ठल जाधव, शुभम वाघेरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम खेडेकर यांनी केले.

Latest News