”मी आता चौकशीच थांबवतो’ – जे.एन. पटेल

चौकशी आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायाधीश जे.एन. पटेल म्हणाले…

प्रतिनिधी

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणारा आयोग गुंडाळणार असल्याचे खुद्द आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश जे.एन. पटेल यांनी शुक्रवारी कोर्टात सांगितले. या चौकशी आयोगातील कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांपासून पगार मिळत नाही. आयोगाकडे राज्य सरकारही लक्ष देत नाही. यामुळे चौकशी आयोगाचा आजचा शेवटचा दिवस असून हा आयोग गुंडाळण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सरकारने फेब्रुवारी २०१८ मध्ये द्विसदस्यीय न्या. जे.एन. पटेल आयोग नेमला होता. आयोगाने वेळोवेळी राज्य सरकारकडे सुविधेबाबत मागणी केली होती. मुख्य सचिवांना त्याबाबत पत्रे पाठवली. मात्र सरकारने सुविधा दिल्या नाहीत, असा दावा आयोगाच्या अध्यक्षांनी केला आहे.

कोरेगाव भीमा दंगल हे षड‌्यंत्र असल्याचा दावा करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटी स्थापण्याची मागणी केली होती. मात्र, त्यापूर्वीच केंद्राने हे प्रकरण एनआयएकडे सोपवले. या पार्श्वभूमीवर आयोगाने कामकाज गुंडाळणे हा सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

Latest News