PUNE: बेकायदेशीर दस्त नोंदणीची चौकशी करण्यासाठी तपासणी पथक…लोकजनशक्ती पार्टीच्या तक्रारीची शासनाकडून दखल…


सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली-२० ची होणार तपासणी
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली-२० मध्ये रेरा कायद्याची पायमल्ली करून झालेल्या दस्त नोंदणीची चौकशी करण्यासाठी तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे.सह जिल्हा निबंधक (मुद्रांक जिल्हाधिकारी) संतोष हिंगणे यांनी तसा आदेश काढला आहे.तपासणी पथकामध्ये एक सह दुय्यम निबंधक वर्ग-१,दोन वरिष्ठ लिपिक,एक कनिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे.या प्रकरणी चौकशीची मागणी लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे पुणे शहराध्यक्ष संजय आल्हाट यांनी दि.८ ऑक्टोबर रोजी सह जिल्हा निबंधक (मुद्रांक जिल्हाधिकारी) यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती.बांधकामाच्या ग्रामपंचायत परवानग्या असलेल्या दस्तांची सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली-२० मध्ये नोंदणी करण्यात आल्या.त्यातून महा रेरा कायद्याची पायमल्ली करण्यात आली.१५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आणि नंतरही येथील अधिकाऱ्याने दस्त नोंदणी चालू ठेवली.हे दस्त सर्व आवश्यक बांधकाम परवानग्या घेऊन केलेले आहेत का
आणि कबुली जबाबासाठी राखून ठेवले आहेत का याची चौकशी व्हावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित उपनिबंधकाचा पदभार काढून घेण्यात यावा,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती.अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तसेच पुणे जिल्हाधिकारी यांनाही या निवेदनाची प्रत पाठविण्यात आली होती.या पाठपुराव्याची दखल घेऊन तपासणी पथक नियुक्त करण्यात आले असून त्यात एक सह दुय्यम निबंधक वर्ग -१,दोन वरिष्ठ लिपिक,एक कनिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे.कायद्याची पायमल्ली करून अवैधरित्या दस्त नोंदणी करणे हा गंभीर प्रकार असून तपासणी पथकाने तातडीने तपासणी करून गैर प्रकार उघडकीस आणावेत आणि या द्वारे दोषींना शिक्षा व्हावी,असे लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे पुणे शहराध्यक्ष संजय आल्हाट यांनी म्हटले आहे.