पिंपरी विधानसभेसाठी राजेश पिल्ले महायुती पक्षाकडून इच्छुक


पिंपरी विधानसभेसाठी राजेश पिल्ले महायुती पक्षाकडून इच्छुक
पिंपरी : माजी नगरसेवक राजेश पिल्ले यांनी देखील २०२४ च्या पिंपरी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. नुकतीच मुंबई मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची भेट झाली आहे.
पिंपरी मतदार संघाचा अजित पवार यांनी सविस्तर आढावा घेत चर्चा केली आहे. २०१४ व २०१९ मध्ये देखील ते आमदारकीसाठी इच्छुक होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून पिंपरी विधानसभेसाठी ते निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. माजी नगरसेवक, क्रीडा सभापती अशा विविध पदांवर त्यांचा राजकीय व प्रशासकीय अनुभव दांडगा आहे.