राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर !पिंपरी विधानसभेची उमेदवारी सुलक्षणा धर यांना

सुलक्षणा धर यांनी बाजी मारली!
पिंपरी विधानसभेची उमेदवारी जाहीर !
पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निष्ठावंत माजी नगरसेविका सुलक्षणा (धर) शीलवंत यांची उमेदवारी आज सायंकाळी साडेचार वाजता मुंबईतून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे.
गेली दोन दिवस पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण ? असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. आज दुपारी महाविकास आघाडी ची उमेदवारी माजी आमदार अँड गौतम चाबुकस्वार यांना दिली असल्याची बातमी मीडियाला पोचली होती. दरम्यान याबाबत अनेक पत्रकारांनी मुंबईपर्यंत बातमीची शहानिशा केली परंतु त्याबाबत कसलाही खुलासा दुजोरा मिळत नव्हता. त् आता साडेचारच्या दरम्यान जयंत पाटील यांची पत्रकार
परिषद मुंबई येथे पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये यांची दोन दिवसापूर्वी महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. सुलक्षणा धर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आता मतदारसंघात
पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा (धर) शिलवंत यांचे नाव निश्चित झाल्याचे जाहीर करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील दोन ते तीन जागासंदर्भात उमेदवारांची घोषणा केली आहे. यात खडकवासला मतदारसंघातून सचिन दोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम यांच्यावरून पुन्हा विश्वास ठेवला आहे. परंडा मतदारसंघातून राहुल परांडे यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे.दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून अशीच वर गटातील नरहरी झिरवळ यांच्या विरोधात त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आज जयंत पाटील यांनी नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात सुनीता सारसकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता गोकुळ झिरवाळ पुढे काय भूमिका घेणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला बीडमधून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील बागलाण विधानसभा मतदारसंघातून दीपिका चव्हाण यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभ केले आहे. त्यातच एरंडोल विधानसभा मतदारसंघातून सतीश पाटील तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यातच आर्वी विधानसभा मतदारसंघातून मयूर काळे या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहे.जुन्नर विधानसभा मतदारसंघातून सत्यशिल शेरकर यांना आज शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. या ठिकाणी त्यांचा सामना अजित पवार गटातील विद्यमान आमदार अतुल बेनके यांस यांच्या सोबत होणार आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुलक्षणा शीलवंत धस यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना अजित पवार गटातील विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या सोबत होणार आहे.
