आरोग्य देवते धन्वंतरीचे सेवा आरोग्य फाऊंडेशन तर्फे पूजन…

rr

पुणे ( प्रतिनिधी) ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना-
दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी.या दिवशी आरोग्य देवता असलेल्या धन्वंतरीचे पूजन केले जाते.सर्वांच्या आयुष्यात सुख,समृद्धी व आरोग्याची प्रार्थना केली जाते.धन्वंतरी देवी हा आयुर्वेदाची जनक मानली जाते.पृथ्वीतलावर आयुर्वेदाचा प्रसरासाठी भगवान विष्णूने धन्वंतरीचे रूप धारण केले अशी मान्यता आहे.
हिंगणे होम कॉलनी येथील सेवा आरोग्य फाऊंडेशन ह्या सेवा वस्तीतील आरोग्य सेवा कार्य करणाऱ्या संस्थेच्या कार्यालयात धन्वंतरी पूजन व दीपावली महोत्सव साजरा करण्यात आला.ह्या कार्यक्रमास सेवा भारतीचे पश्चिम प्रांत सेवा प्रमुख शैलेंद्र बोरकर प्रमुख पाहुणे म्हणून होते उद्घाटन पर भाषणात ते म्हणाले,”सेवा आरोग्यच्या कार्यकर्त्यांनी निरामय आरोग्य सेवा देण्याचा वसा घेतला असून सेवा आरोग्य फाऊंडेशनचे कार्य हे कुटुंब प्रबोधन,पर्यावरण,सामाजिक समरसता,स्व-बोध (स्वावलंबन) व नागरी कर्तव्ये पालन ह्या पंचसूत्री आधारावर अविरतपणे चालू असून भविष्यातही सेवा वस्तीतील कोणताही नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही असे कार्य करीत राहील.”असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सुरवातीस गिरीश जठार व डॉ सौ वैशाली जठार या दांपत्याने धन्वंतरी पूजन केले.सेवा आरोग्यचे प्रदीप कुंटे यांनी सेवा आरोग्य फाऊंडेशन च्या विविध वस्त्यांमधील चालणाऱ्या सेवा कार्याची माहिती सांगितली.
आंतरराष्ट्रीय कीर्तनकार हभप मोरेश्वर बुवा जोशी यांचेही यावेळी मार्गदर्शन झाले.तसेच मयुरेश्वर मंदिर न्यास तर्फे एक लक्ष रुपयांची मदतीची औषधे सेवा आरोग्य फाऊंडेशन संस्थेला वस्तीमधील आरोग्य कार्यासाठी प्रदान करण्यात आली.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय सेवा आरोग्य फाऊंडेशनचे संचालक डॉ सतीश जोशी यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वंदना पवार ह्यांनी केले.
विवेक बाकरे यांनी पसायदान गायिले.
कार्यक्रमास संभाजी भाग संघचालक अनिल व्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य व सेवा आरोग्य चे संचालक रवी शिंगणापूरकर,केशव माधव न्यास चे अध्यक्ष नंदाजी भागवत,सचिव अरविंद देशपांडे,विश्वस्त प्रकाश देशपांडे,यशवंत ववले,
संचालक मनोज देशमुख,दत्ताजी वाळवेकर ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
याच कार्यक्रमात लेखक व दिग्दर्शक नाट्यकर्मी कुलदीप धुमाळे व त्यांचे सहकारी यांनी “चला करू मतदान”हे पथनाट्य सादर करून मतदारांनी जागृत पणे शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन उपस्थित सेवा वस्तीतील नागरिकांना व कार्यकर्त्यांना केले.
या कार्यक्रमाला हिंगणे होम,कोथरूड,कर्वेनगर,वारजे, बावधन,संभा वस्ती,उत्तम नगर,शिवणे परिसरातील नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अधिक माहितीसाठी
डॉ सतीश जोशी
मोबाईल 9822473501
संचालक
सेवा आरोग्य फाऊंडेशन
कर्वेनगर पुणे

Latest News