Election: नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे- जिल्हाधिकारी डॉ. दिवसे


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे. मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणीदेखील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेऊन पूर्वतयारी करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने जिल्ह्यात परवानाधारक शस्त्रे जमा केली आहेत. त्यांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय निवडणूक निरीक्षकांना देण्यात यावी, तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सी-व्हिजिल, खर्च, माध्यम संनियंत्रण समिती यांच्यासह इतर अहवाल वेळोवेळी द्यावेत.उमेदवारांचा निवडणूक खर्च योग्य पद्धतीने नोंदविला जाईल, यावर विशेष लक्ष देण्यासह निवडणूक खर्चाची पडताळणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत हे आदेश देण्यात आले. याप्रसंगी निवडणूक खर्च निरीक्षक, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होतेपुणे जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी शहरी भाग आणि ग्रामीण भाग अशा स्तरांमध्ये होणार असून, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी येथे, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी थेरगाव येथील कामगार भवनमध्ये होणार आहे. पर्वती, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम येथे होणार आहे. ग्रामीण भागातील मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय त्या त्या भागात होईल