भोसरीच्या विकासासाठी मत द्या, संधी साधू उमेदवाराला घरी बसवा – हरिश उर्फ भाऊसाहेब डोळस

IMG-20241114-WA0828

भोसरीच्या विकासासाठी मत द्या, संधी साधू उमेदवाराला घरी बसवा – हरिश उर्फ भाऊसाहेब डोळस

भोसरी, प्रतिनिधी
भोसरी मतदारसंघाची वाढती लोकसंख्या व नागरी सुविधावर येणार ताण पाहता भोसरीतील सज्ञ जनतेने भोसरीच्या विकासासाठी मत देऊन संधी साधू व स्वार्थी वृत्तीला बाजुला सारुन माझ्यासारख्या कष्टकरी व बहुजन वर्गातील उमेदवाराला प्रचंड मते देऊन विजयी करा असे आवहान भोसरी विधानसभेचे अपक्ष उमेदवार हरिश उर्फ भाऊसाहेब डोळस यांनी च-र्होली , डुडूळगाव येथील प्रचार फेरी दरम्यान मतदारांना केले.

       सध्या निवडणूकीत संधी साधू व स्वार्थी वृत्ती बाळगून राजकारण करणाऱ्यांची संख्या दिवसेन दिवस वाढत असून सेवाभावाची जागा मेवा खाव आणि जनसेवेपासून घुमजाव या वृत्तीने घेतली आहे. यामुळेया मतदारसंघातील मतदारांचे जीवन हे अधिकच कष्टमय होत आहे. यामुळे मतदारांनी येथील विकासासाठी मला मत देऊन प्रचंड मतानी निवडून द्यावे व येणाऱ्या २० नोब्हेंबरला  संगणक या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतानी विजयी करावे असे आवहान केले. यावेळी मतदारांनी डोळस यांच्या समोर अनेक समस्या उपस्थित करुन विवीध अडचणी समोर मांडल्या याच अडचणी सोडविण्यासाठी आपण मला मते देऊन विजयी करावे अशी विनंती केली.

Latest News