क्षणभर प्रचार विसरून चिमुकल्यांच्या आनंदात रमल्या सुलक्षणा शिलवंत

चिंचवड (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज चिंचवड परिसरामध्ये आपल्या प्रचार फेरीचे आयोजन केले होते.
या प्रचारफेरी दरम्यान त्या चिंचवड स्टेशन परिसरात आल्या त्यावेळी काही चिमुकली मुले तिथे खेळताना त्यांनी पाहिली. आपला प्रचार विसरून सुलक्षणा शिलवंत या त्या बालचमुंमध्ये मिसळून गेल्या क्षणभर आपला प्रचार गेली काही दिवस चालू असलेल्या पदयात्रामुळे झालेली दमछाक हे सारे त्या विसरून गेल्या.
आज 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून देशात साजरा केला जातो. आणि आजच्या दिवशी या बालकांमध्ये त्या सहभागी झाल्या आणि त्यांना खाऊ देखील वाटला.
यावेळी अनेक मुलांची सुलक्षणा शिलवंत यांनी संवाद साधला. ते कोठे राहतात. कोणत्या शाळेत जातात. अशी चौकशी त्यांनी केली तेव्हा बहुसंख्या मुलांनी आपल्या घरची स्थिती चांगली नसल्याने शाळेत जाता येत नाही असे सांगितल्याने सुलक्षणा शिलवंत काहीशा भावनिक झाल्या. त्यांना आपले लहानपण देखील आठवले. या बालकांबरोबर संवाद साधताना त्या म्हणाल्या, काळजी करू नका तुमची शिकण्याची आवड आता पूर्ण होईल. मी स्वतः यासाठी प्रयत्न करेल प्रत्येक मुलाला शिकण्याचा अधिकार आहे तुम्हाला खूप शिकून खूप मोठे व्हायचे आहे असेही त्यांनी त्या बालकांना यावेळी सांगितले.

Latest News