महाराष्ट्रात मविआचे सरकार यावे ही मतदारांचीच इच्छा – के. जे. जॉर्ज कर्नाटकचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे स्टार प्रचार यांचे प्रतिपादन


महाराष्ट्रात मविआचे सरकार यावे ही मतदारांचीच इच्छा – के. जे. जॉर्ज कर्नाटकचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे स्टार प्रचार यांचे प्रतिपादन
पिंपरी, पुणे (दि. १५ नोव्हेंबर २०२४) मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने देशभर जाती, धर्मा मध्ये मतभेद निर्माण करून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम भाजपा करीत आहे. त्याला काँग्रेस धर्मनिरपेक्ष विचार पुढे नेत उत्तर देत आहे. मागील दहा वर्षात भाजपाने सर्वसामान्य साठी एकही योजना पूर्णत्वास नेली नाही, तर फक्त घोषणा देत मतदार राजाची दिशाभूल केली. मात्र काँग्रेसने पंचसूत्री कार्यक्रमा नुसार कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. आता महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे सरकार यावे अशी मतदारांचीच इच्छा आहे असे प्रतिपादन
काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य व स्टार प्रचारक, कर्नाटकचे ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी काळेवाडी पिंपरी येथे सोमवारी संवाद सभेत केले.
महाविकास आघाडीच्या पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या संवाद सभेत के. जे. जॉर्ज बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बाबू नायर, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, लक्ष्मी नायर, पिंपरी चिंचवड दक्षिण भारतीय सेलचे अध्यक्ष जॉर्ज मॅथ्यू,