फुगेवाडी ग्रामस्थांचा सुलक्षणा शीलवंत यांना एकमुखी पाठिंबा

पिंपरी (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)-

विठ्ठल मंदिरात आयोजित काल्याच्या कार्यक्रमातच तुतारीचा जयघोष करीत फुगेवाडीतील ग्रामस्थांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे.
पिंपरी चिंचवड शहर हे संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा वारसा चालवणारे शहर म्हणून ओळखले जाते.

गेली पंधरा दिवस पिंपरी चिंचवड शहरात विठ्ठल रखुमाई च्या मंदिरात काकड आरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी विधानसभा मतदार संघातील सर्व काकड आरत्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी उपस्थिती लावली

व स्वतःही हरिभक्तित तल्लीन झाल्या होत्या. वैष्णवांच्या या सोहळ्याला त्यांनी दाखवलेली उपस्थिती ही शहरातील हरिभक्त परायणांना भावून गेली.
फुगेवाडी येथील काकड आरतीचा समारोप असलेल्या काल्याच्या कार्यक्रमात आज डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी उपस्थिती दर्शविली त्यावेळी फुगेवाडीतील समस्त ग्रामस्थांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले.

या काल्याच्या कीर्तनातच महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचे चिन्ह असलेल्या तुतारी वाजवणारा माणूस याचा जयघोष केला. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी या जयघोषाने विठ्ठल नामाच्या गजराबरोबरच तुतारीचा गजरही परिसरात दुमदुमला होता.
यावेळी भाविकांनी डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना आशीर्वाद देत. प्रत्यक्ष पांडुरंगच आपल्या पाठीशी उभा आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला.
फुगेवाडी ग्रामस्थांच्या आशीर्वादाने भारावून गेलेल्या डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी समस्त फुगेवाडी ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.

Latest News