राज्यात मतदारांचा कल महायुतीच्या बाजूने – खा. श्रीरंग बारणे यांचा विश्वास


राज्यात मतदारांचा कल महायुतीच्या बाजूने – खा. श्रीरंग बारणे यांचा विश्वास
अण्णा बनसोडे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा
पिंपरी, पुणे (दि. १७ नोव्हेंबर २०२४) महायुतीच्या माध्यमातून राज्यात अनेक मोठी कामे झाली आहेत. राज्यात मतदारांचा कल महायुतीच्या बाजूने आहे. २३ नोव्हेंबर नंतर राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने विराजमान होईल असा विश्वास खासदार व शिवसेनेचे स्टार प्रचारक श्रीरंग बारणे यांनी येथे केले. अण्णा बनसोडे यांच्या प्रचारात मी सहभागी आहे.बत्यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. समोरच्या उमेदवाराचा परिचय सुद्धा मतदारांना नाही त्यामुळे बनसोडे यांचा विजय निश्चित आहे असेही खासदार बारणे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ मोहन नगर, महात्मा फुले नगर, काळभोर नगर भागात प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी मतदारांशी संवाद साधताना खासदार श्रीरंग आप्पा बारणे बोलत होते.
यावेळी आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर कांबळे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, राजू दुर्गे, शितल शिंदे, सतीश दरेकर, शैलेश मोरे, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, भाजप शहर उपाध्यक्ष गणेश लंगोटे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, संजय अवसरमल आदींसह युवक, युवती व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.