पुणेतील 21 विधानसभा मतदारसंघांसाठी पोलीस बंदोबस्तात साहित्याचे वितरण…

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक यांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन निवडणुक निर्णय अधिकारी यांनी केले.त्यानंतर हे सर्व कर्मचारी -अधिकारी बसेसने संबंधित मतदान केंद्रावर जाण्यास निघाले. मतदान केंद्रांवर कर्मचारी पोहचल्यानंतर त्याची माहिती झोनल अधिकारी यांना कळविण्यात आली.पुणे, – जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांसाठी मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात साहित्याचे वितरण अधिकारी -कर्मचारी यांना करण्यात आले. मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर दुपारपासून अधिकारी-कर्मचारी पोहोचण्यास सुरुवात झाली.सायंकाळपर्यंत सर्व कर्मचारी मतदान केंद्रावर पोहचले आणि मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज केले.प्रत्येक विधानसभासंघाच्या कार्यालयात मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकिटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात आले.

Latest News