पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संवेदनशीलता जपणारी पुणे भेट…


पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे येथे विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी आले होत.आयोजित केलेल्या सभेनंतर त्यांनी पंधरा मिनिटे पाच जणांसाठी राखून ठेवली होती हे विशेष उल्लेखनीय आहे.महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती,पुणेचे अध्यक्ष जयराम फगरे ,वय वर्ष ९४,यांच्या हस्ते सन्मानपत्र स्वीकारले . फगरे यांनी हे चांदीचे सन्मान चिन्ह मागेच मोदीजींना देण्यासाठी तयार करून ठेवले होते .नरेंद्र मोदी हिंदी भाषेचे दूत आहेत कारण ते सर्वत्र हिंदीतून संवाद साधतात. म्हणून फगरे यांना त्यांचा सत्कार करायची फार इच्छा होती. हा योग १२ नोव्हेंबरच्या मोदीच्या दौऱ्यात आला. एकता मासिकाच्या संपादिका रुपाली भुसारी यांनी सप्टेंबरच्या अंकात फगरे यांच्या कार्य विषयक आणि मोदीजींना भेटण्याची त्यांची इच्छा याविषयी प्रसिद्ध केला होता.हा लेख पुणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष मधुमिलींद मेहेंदळे यांनी लिहीला होता.सन्मान चिन्हाचा मजकूर आकाशवाणीचे डॉ सुनिल देवधर यांनी तयार केला होता.याविषयी खा. मेधा कुलकर्णी यांना रुपाली भुसारी आणि सुनील देवधर यांनी माहिती कळवली होती. त्यांच्या मदतीने या सगळ्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ठरवली गेली.त्यात पंधरा मिनिटे पंतप्रधानांसह संवाद साधण्याचे भाग्य यांना लाभले . पुणेरी पगडी ,शाल, सन्मान चिन्ह फगरे यांनी त्यांना दिले . देवधरांनी पुस्तके दिली.तर भुसारी यांनी एकताचा दिवाळी अंक मोदींना दिला.नरेंद्र मोदी यांनी एकता मासिक खूप जूने असल्याचे आपल्या स्मरणात आहे असे सांगितले.तसेच एकता मासिकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जेष्ठ असणाऱ्या फगरे यांची इच्छापूर्ती झाली.खा. मेधा कुलकर्णी यांनी जनतेच्या भावना विचारात घेऊन कार्याचा वसा चालू ठेवलेला आहे .