पुणे-नगर रस्त्यावर गेल्या 10 वर्षांत या रस्त्याच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे हे काम रखडले – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना )वडगाव शेरी मतदारसंघाची लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी देखील वाढली आहे. पुणे-नगर रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नदीपात्रातून प्रस्तावित असलेल्या शिवणे-खराडी रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण होणे गरजेचे आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पालिकेने प्राधान्यक्रमाणे या रस्त्याच्या कामातील अडचणी दूर करून हा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पठारे यांनी केली.पुणे-नगर रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी खराडी-शिवणे हा नदीपात्रातील प्रलंबित रस्ता तातडीने पूर्ण करण्याची मागणी वडगाव शेरीचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली.आमदार पठारे यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेत वडगाव शेरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते गेल्या १० वर्षांत या रस्त्याच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे हे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पालिका प्रशासनाने देखील हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही दिली असल्याचे आमदार पठारे यांनी सांगितले.शिवणे ते खराडी हा रस्ता नदीपात्रातून करण्यात येणार आहे. हा रस्ता पूर्णत्वास गेल्यानंतर वाहन चालकांचा त्रास कमी होणार आहे. कमी वेळेत नागरिकांना नगर रोडवर जाणार मदत होणार आहे. या रस्त्यामध्ये खाजगी जागा मालकांच्या जमिनी जात असल्याने हे काम रखडले आहे. महापालिका प्रशासनाने या जमिनी ताब्यात घेऊन तातडीने हा रस्ता पूर्ण करावा अशी मागणी होत आहे.

Latest News