पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ॲक्शन मोडवर…


पिंपरी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) ……..लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत पीएमआरडीए हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याचे दिसून येत आहे. आचारसंहिता संपताच प्रशासनाने या बांधकामांवर कारवाईचा हातोडा उगारण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत बांधकाम धारकांना बांधकाम काढून घेण्याबाबत नोटिसा दिल्या जात आहेत. त्यानंतरही बांधकाम सुरू ठेवल्यास गुन्हे दाखल केले जात आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदाराम चौधरी यांना पीएमआरडीएने अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस दिली होती. तिचे पालन न करता चौधरी यांनी चार मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले. याबाबत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक कुमार सहानी यांना देखील पीएमआरडीएने अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस दिली होती. तिचे पालन न करता सहानी यांनी चार मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले. याबाबत त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ॲक्शन मोडवर आले आहे. अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस दिल्यानंतरही बांधकाम सुरू ठेवल्याप्रकरणी गहूंजे येथील दोघांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
.इंदाराम चौधरी (रा. गहूंजे, ता. मावळ), दीपक कुमार सहानी (रा. गहूंजे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणीमहानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीएचे) कनिष्ठ अभियंता गणेश जाधव यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे