शिवसेने पेक्षा आमचा स्ट्राईक रेट चांगला,: छगन भुजबळ

मुंबई (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

महायुतीत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट अधिक असल्याचे त्यांनी म्हटलं. पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, अजित पवार यांच्या सोबत आमची बैठक झाली. त्या बैठकीत स्ट्राईक रेटबाबत विषय निघाला. राज्यात भाजपाला सर्वाधिक मते मिळाली आहेत. भाजप एक नंबर तर दोन नंबरला आम्ही आहोत आणि तीन नंबरला शिंदे यांची शिवसेना आहे. त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट चांगला असून शिवसेने इतकीच मंत्रिपदं आम्हाला मिळावीत अशी मागणी केली असल्याचं भुजबळ म्हणाले

भुजबळ यांना मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का? ,असा सवाल देखील करण्यात आला. त्यावर दरवेळी 160 आमदार असतात यावेळी जास्त आमदार आहेत.

सर्व पक्षांमधील नवीन जुने चेहरे येतील, असं छगन भुजबळ म्हणाले.येत्या 5 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या काही संभाव्य मंत्र्यांची नावे देखील समोर आली आहेत. यामध्ये नाशिकमधून छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ यांच्या नावांची सध्या जोरदार चर्चा आहे.

याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, हे मी तुमच्याकडून ऐकतोय. आमचे नेते अजित दादा आहेत ते स्वतः फोन करून सांगतील तेव्हा ते खरं आहे , अशी सूचक प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली

तसेच अजित पवार शपथ विधीपूर्वी आज दिल्लीत दाखल झाले आहेत. यावर देखील भुजबळ यांना प्रश्न करण्यात आला. त्यावर आमचे प्रांत अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष दिल्लीमध्ये आहेत. त्यांना इकडे बोलवण्यापेक्षा दादा दिल्लीला गेले आहेत, असं त्यांनी सांगितलं

.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली आहे. महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता सरकार स्थापनेकडे लागलं आहे. निकाल लागून आता 11 दिवस उलटले आहेत

तरीही अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळे नव्या सरकारच्या शपथविधीला आता विलंब होत असल्याचे चित्र आहेअशातच अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज (3 डिसेंबर ) माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी मंत्री पदाबाबत मोठ विधान केलंय.