पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाची कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी सुरज साळवे यांची फेरनिवड

पिंपरी चिंचवड (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (प्रतिनिधी) दि.२४ :- अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया कार्यकारणीची निवड आज करण्यात आली असून अध्यक्षस्थानी सुरज साळवे तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार शिवाजी घोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब गोरे हे होते.
पिंपरी चिंचवड महापालिका कै.भा वि कांबळे पत्रकार कक्षात आज सांयकाळी ०६.३९ वाजता बैठक घेण्यात आली. यावेळीज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ,नाना कांबळे,अर्चना मेंगडे, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे,उपाध्यक्ष रेहान सय्यद,सचिव संतोष जराड,सह अनेक पत्रकार उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड डिजीटल मीडिया कार्यकारिणी पुढील प्रमाणे
१) अध्यक्ष – सुरज साळवे
2) उपाध्यक्ष – शिवाजी घोडे
3) सचिव – किशोर सुर्यवंशी
4) प्रसिद्धी प्रमुख – मनोज शिंदे
5) सदस्या – अनुराधा जाधव