हौसे खातीर पिस्टल जवळ बाळगणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, सहकार नगर पोलीसांची कारवाई


हौसे खातीर पिस्टल जवळ बाळगणारा अल्पवयीन बालक ताब्यात सहकार नगर पोलीसांची कारवाई
पुणे (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना ) बालाजी नगर धनकवडी मधील के के मार्केट जवळ एका अल्पवयिन तरुणाला पॅन्टमध्ये खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह सापडल्याने आरोपीला सहकारनगर पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतेले आहे
सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पोलीस स्टेशन हद्दीत नवीन वर्षे २०२५ चे आगमना निमीत पेट्रोलींग करीत तीन हती चौकात आले असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली होती , एक इसम के. के. मार्केट पाकींग जागेतील टीव्हिएस शोरूमचे पाठीमागील गल्लीत एका बंद दुकानासमोर बालाजीनगर पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत थांबला असुन त्याचे कबरेला पिस्टल सारखे हत्यार लावलेले दिसत आहे
व तो सशयरित्या उभा आहे.अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक श्री छगन कापसे यांना कळविली असता त्यांनी लागलीच सपोनि सागर पाटील व अंमलदार यांची टीम तयार करुन त्याना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले
त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे पॅन्टमध्ये खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह मिळुन आल्याने आरोपीस ताब्यात घेण्यात आले
सदरचे ६०,०००/- रु किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल पंचा समक्ष जप्त करुन त्याचेविरुध्द सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ०१/२०२५ आर्म अॅक्ट क ३ (२५) व महा.पो.अधि. क ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे
.सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त परि-२, श्रीमती स्मार्तना पाटील, मा.सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विमाग श्री. राहुल आवारे, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकात जाधव, महेश मंडलिक, अमित पदमाळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महश भगत, खंडु शिंदे यानी केली आहे.