येत्या रविवारी ”जनआक्रोशमोर्चा” चे पुण्यात आयोजन सर्व पक्षीय – सर्व धर्मीय पक्ष, संघटना , सेवाभावी संस्था आणि संवेदनशील नागरिकांचा…

४ जानेवारी २०२५ ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

तरी संवेदनशील भारतीय नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने यावे.
जन आक्रोश मोर्चाच्या मागण्या
!! न्यायाचा आवाज बुलंद करूया !!

१) सरपंच संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्यांना तातडीने अटक झाली पाहिजे.
२) सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना त्यांच्या खूनातील सर्व दोषींना कडक शासन झाले पाहिजे.
३) दोन्ही खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगारांना तातडीने कडक शासन झाले पाहिजे.
४) संतोष देशमुख यांच्या खुनाचे मास्टर माईंड शोधले पाहिजेत.
५) खटल्याचा निकाल लागेपर्यंत ना.धनंजय मुंढे आणि ना. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू नये.
६) त्वरित त्यांचा पाय उतार व्हावा.

सर्व न्यायप्रिय, संविधानप्रेमी, लोकशाहीवादी, नागरिक, संघटना यांनी या जन आक्रोश मोर्च्यात सहभागी होऊन न्यायाचा आवाज बुलंद करावा ही नम्र विनंती !

मोर्च्यात सहभाग का घ्यायचा
हा मोर्चा महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी आहे
हा मोर्चा राक्षसी प्रवृत्ती च्या विरोधात आहे
हा मोर्चा प्रशासनाला जाग आणण्यासाठी आहे
हा मोर्चा सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आहे

आयोजक
पुणे शहर , ग्रामीण आणि जिल्यातील
सर्व पक्षीय – सर्व धर्मीय पक्ष, संघटना , सेवाभावी संस्था आणि संवेदनशील भारतीय नागरिक बंधू आणि भगिनी.

स्व,संतोष दादा देशमुख व स्व,सोमनाथ दादा सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी
दि,५ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे

जनआक्रोशमोर्चा.

ठिकाण ::= लाल महाल( पुणे)
वेळ ::= सकाळी १० वाजता
मोर्चाचा मार्ग ::= लाल महाल,फडके हौद चौक,दारूवाला पूल,अपोलो थियेटर ,के.ई.एम हॉस्पिटल,समर्थ पोलीस स्टेशन,पुणे जिल्हाधिकारी कार्यालय.
प्रमुख उपस्थिती:- सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी संतोष देशमुख
मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील
आमदार:- सुरेश धस
खासदार :- बजरंग सोनवणे
आमदार :- संदीप क्षीरसागर

पुण्यातील जनता संवेदनशील आहे की नाही ते रविवारी समजणार,,,
मी सामील होणार तुम्ही सुद्धा या !