‘एसएई इंडिया चॅम्पियनशिप एम-बाहा’ राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईआरचा प्रथम क्रमांक


“टीम नॅशोर्न्स” ची अकरा पदकांची कमाई, भारतात प्रथम क्रमांक
पिंपरी, पुणे (दि. १६ जानेवारी २०२५) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या एसएई इंडिया एम-बाहा २०२५ या राष्ट्रीय स्पर्धेत रावेत येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) मधील मेकॅनिकल विभागातील “टीम नॅशोर्न्सने” एकूण अकरा पदकांची कमाई करत भारतात प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत देशभरातील पन्नासहून अधिक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या १७ व्या आवृत्तीत आयोजकांनी ट्रॅकमध्ये बदल केला होता आणि त्यात नवीन बिट समाविष्ट केले होते. टीम नॅशोर्न्सने ड्युरेबिलिटी, फिझीकल डायनॅमिक्स, स्टॅटिक इन्फॉर्मेशन, प्रोडक्शन कॉस्ट, मॅन्युव्हरेबिलिटी, डिझाइन, व्हॅलीडेशन अशा ७ विविध विभागात प्रथम क्रमांक व सस्पेन्शन व ट्रॅक्शन, व्हर्च्युअल डायनॅमिक, ऍक्सलरेशन अशा ३ विभागात द्वितीय क्रमांक आणि प्रा. सुखदिप चौगुले यांना द्रोणाचार्य परितोषिक अशा वेगवेगळ्या कसोट्यांमध्ये उज्ज्वल यश संपादन भारतात प्रथम क्रमांक मिळवून या स्पर्धेत २ लाख ७५ हजार रुपयांची पारितोषिके मिळवली. मध्यप्रदेशातील पिथमपूर येथे या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
गेली अनेक वर्षे पीसीसीओईआरचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सातत्याने यश संपादन करीत आहेत. या चुरशीच्या स्पर्धेसाठी विद्यार्थी व मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक वर्षभर तयारी करीत असतात. प्रत्यक्ष स्पर्धा-वाहन बनविण्यासाठी महाविद्यालयाकडून आवश्यक निधी, सोयी-सुविधा, साहित्य आणि मार्गदर्शन मिळते.
स्पर्धेत सहभागी होऊन नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या आदित्य सुतार (कर्णधार व चालक ), आयुष वंदेकर (उपकर्णधार), साजिद मुलानी (चालक) सह २५ विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संघाची ही कामगिरी पाहून, आनंद ग्रुप व रेनो निस्सान ऑटोमोटिव्ह इंडिया या कंपन्यांनी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरु केली आहे. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. हरिश तिवारी, विभागप्रमुख डॉ. गुलाब सिरस्कर यांनी विजयी विद्यार्थांचे व संघाचे मार्गदर्शक प्रा. सुखदिप चौगुले यांचे अभिनंदन केले.